Sanjay Raut | ‘मरेन पण झुकणार नाही,शिवसेना सोडणार नाही’;कारवाईनंतर राऊतांची पहिली प्रतिक्रिया

वैजंता गोगावले, Tv9 मराठी

|

Updated on: Jul 31, 2022 | 9:00 PM

माझ्यावरची कारवाई सूडानं आणि आकसानं होत आहे. सर्वांना माहित आहे काय राजकारण चालू आहे. महाराष्ट्राला कमजोर करण्याचे प्रयत्न आहेत.

मुंबई : गोरेगावमधील पत्राचाळ प्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत यांची आज ईडीने तब्बल साडेनऊ तास चौकशी केली. चौकशीनंतर ईडीने राऊतांना ताब्यात घेतले. राऊतांच्या घरी ईडीचे अधिकारी आल्याचे कळताच राऊतांच्या घराबाहेर शिवसैनिक आणि समर्थकांची मोठी गर्दी जमली होती. ईडीने ताब्यात घेतल्यानंतर संजय राऊतांनी मीडियाशी बोलताना आजच्या कारवाईवर प्रतिक्रिया दिली आहे. माझ्यावरची कारवाई सूडानं आणि आकसानं होत आहे. सर्वांना माहित आहे काय राजकारण चालू आहे. महाराष्ट्राला कमजोर करण्याचे प्रयत्न आहेत. संजय राऊंतांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतोय. मला अटक करायला जात आहेत आणि मी अटक होतोय, असे राऊत म्हणाले.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI