AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अभिनंदन लोकशाही वाचली, Urmila Matondkar यांचा Devendra Fadnavis यांना टोला

| Edited By: | Updated on: Jan 28, 2022 | 6:21 PM
Share

सर्वोच्च न्यायायलयाने आज अखेर आमदारांचे निलंबन रद्द करण्याचा महत्वाचा निर्णय घेतलाय. या निर्णयानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह भाजप नेत्यांकडून महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारवर जोरदार हल्ला चढवण्यात येत आहे.

मुंबई : विधानसभेतील भाजपच्या 12 आमदारांना सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) मोठा दिलासा दिलाय. विधानसभेत तालिका अध्यक्षांच्या दालनात गोंधळ घातल्याच्या कारणावरुन या आमदारांचं वर्षभरासाठी निलंबन करण्यात आलं होतं. त्यानंतर या आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. सर्वोच्च न्यायायलयाने आज अखेर आमदारांचे निलंबन रद्द करण्याचा महत्वाचा निर्णय घेतलाय. या निर्णयानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह भाजप नेत्यांकडून महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारवर जोरदार हल्ला चढवण्यात येत आहे. तर शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) आणि भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांच्यात ट्वीटरवर जुंपली असल्याचं पाहायला मिळत आहे.