AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या शिंदे गटाच्या आमदाराचा ढोल वाजवतानाचा व्हिडीओ व्हायरल

वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या शिंदे गटाच्या आमदाराचा ढोल वाजवतानाचा व्हिडीओ व्हायरल

| Updated on: Sep 20, 2024 | 12:47 PM
Share

देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे असताना एका गणेशमंडळात मावळ पथकात सामील होत ढोल वाजविल्याचे पाहायला मिळाले. फडणवीसांसमोर मावळ ढोल पथक होते. यादरम्यान, त्यांना ढोल वाजविण्याचा मोह काही आवरला नाही आणि त्यांनी थेट ढोलच हाती घेतला. यानंतर आता शिंदेंच्या आमदाराचा ढोल वाजवतानाचा व्हिडीओ व्हायरल होतोय

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी अमेरिकेत आरक्षणासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील आमदार संजय गायकवाड यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. “जो राहुल गांधीची जीभ छाटेल त्याला ११ लाखांचे बक्षीस देण्यात येणार”, असं संजय गायकवाड यांनी म्हटले होते. यानंतर वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या शिंदे गटाच्या आमदाराचा ढोल वाजवतानाचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. बुलढाण्यामध्ये शिंदे गटाच्या शिवसेनेतील आमदार संजय गायकवाड यांचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. बुलढाण्यात आमदार संजय गायकवाड यांनी ढोल वाजवला होता. हा ढोल वाजवतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. बुलढाण्यात लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमापूर्वी संजय गायकवाड यांनी ढोल वाजवला होता. त्यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा ढोल वाजवताना व्हिडीओ शूट केला होता. दरम्यान, बुलढाण्यातील स्थानिक नागरिकांसोबत संजय गायकवाड यांनी दणक्यात ढोल वाजवत आनंद लुटला. बघा व्हायरल होणारा व्हिडीओ

Published on: Sep 20, 2024 12:47 PM