AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात दणक्यात वाजवला ढोल, बघा व्हिडीओ

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात दणक्यात वाजवला ढोल, बघा व्हिडीओ

| Updated on: Sep 14, 2024 | 4:59 PM
Share

मुंबईसह राज्यभरात गणेशोत्सव अगदी उत्साहात सुरू आहे. लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी अवघे तीन दिवस शिल्लक राहिले असल्याने भाविकांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील बाप्पांच्य दर्शनासाठी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे असताना एका गणेशमंडळात मावळ पथकात सामील होत ढोल वाजविल्याचे पाहायला मिळाले. देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मावळ ढोल पथक वाजत होते. यादरम्यान, त्यांना ढोल वाजविण्याचा मोह काही आवरला नाही. नागपुरातील युवक गणेशोत्सव मंडळात देवेंद्र फडणवीस यांनी ढोल वाजवण्याचा आनंद लुटला. सध्या देवेंद्र फडणवीस यांचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. तर दुसरीकडे गेल्या काही दिवसांपूर्वी विरोधकांवर टीका करणाऱ्या अमोल मिटकरींमधला गायक पाहिला मिळाला होता. अकोल्यातील न्यु तोष्णीवाल लेआऊट भागातील आयोजित केलेल्या भजनसंध्या कार्यक्रमात अमोल मिटकरी यांनी गाणं गायलं. अमोल मिटकरी यांनी ‘माऊलीची माया माझी, भीमरावराया’ हे भीमगीत आपल्या पहाडी आवाजात सादर केलं होतं. बघा व्हिडीओ…

Published on: Sep 14, 2024 04:59 PM