Sanjay Raut | गोव्याच्या कोणत्या जागा द्यायला काँग्रेस तयार? संजय राऊत सांगतात…

महाराष्ट्रात महाविकास आघाडीसोबत राष्ट्रवादी पक्ष आहे त्यांचाही विचार व्हायला हवा. त्यासंदर्भात त्यांची भूमिका फार सकारात्मक दिसली नाही. राष्ट्रवादीसाठी त्यांनी एखाद दुसरी जागा सोडण्याची तयारी दाखवली. पण ज्या जागेचा आग्रह राष्ट्रवादीचे अध्यक्ष करीत होते ती जागा सोडायला नाहीत, अशी माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Jan 11, 2022 | 7:01 PM

मुंबई : गोव्यातील स्थानिक नेतृत्वाला अजूनही असं वाटतं की गोव्यात अजूनही काँग्रेस सुस्थितीत आहे. काँग्रेस स्वबळावर निवडणुका लढवून पूर्ण बहुमताने सत्तेवर येईल. मग सत्तेमध्ये वाटेकरी कशाला? त्यांची भूमिका आम्हाला त्यांच्या बोलण्यातून थोडीफार जाणवली. पण असं नाही की बोलणी फिस्कटली. जागावाटपाबाबत काही भूमिका असतात. आम्ही त्यांच्याकडे पाच जागा मागितल्या होत्या. त्याच्यावर चर्चा नक्कीच झाली ते आम्हाला 2 ते 3 जागा तयार झाले होते. आम्ही त्यांच्याकडे म्हापुसा, पेंडणे या जागा ज्या महाराष्ट्राच्या सीमेला लागून आहेत त्या मागितल्या. त्या त्यांना देणं शक्य नव्हतं. कारण त्यांनी पहिल्या यादीत तिथे उमेदवार जाहीर केलेत. मग आम्ही त्यांना शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्रात महाविकास आघाडीसोबत राष्ट्रवादी पक्ष आहे त्यांचाही विचार व्हायला हवा. त्यासंदर्भात त्यांची भूमिका फार सकारात्मक दिसली नाही. राष्ट्रवादीसाठी त्यांनी एखाद दुसरी जागा सोडण्याची तयारी दाखवली. पण ज्या जागेचा आग्रह राष्ट्रवादीचे अध्यक्ष करीत होते ती जागा सोडायला नाहीत, अशी माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें