Omraje Nimbalkar | त्या प्रकरणासाठी ओमराजे निंबाळकरांवर दबाव, संजय राऊतांनी सांगूनच टाकलं
शिवसेना ठाकरे गटातील 6 खासदार फुटणार असल्याच्या चर्चेमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना गंभीर आरोप केले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत ठाकरे गटातील काही खासदारांसोबत बैठक घेतल्याची माहिती समोर आली आहे.
शिवसेना ठाकरे गटातील 6 खासदार फुटणार असल्याच्या चर्चेमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना गंभीर आरोप केले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत ठाकरे गटातील काही खासदारांसोबत बैठक घेतल्याची माहिती समोर आली आहे. तसेच हे खासदार स्वतंत्र गट स्थापन करण्यासाठी लोकसभा अध्यक्षांकडे पत्र देणार असल्याची चर्चा सुरू आहे.
दरम्यान, पक्षफुटी रोखण्यासाठी ठाकरे गटाकडून खासदारांना व्हिप जारी करण्यात आला आहे. याचवेळी संजय राऊत यांनी ओमराजे निंबाळकर यांच्यावर दबाव आणला जात असल्याचा आरोप केला. पवनराजे आणि त्यांच्या ड्रायव्हरच्या खून प्रकरणातील निकाल आपल्या बाजूने हवा असेल तर आमच्यासोबत या, असा दबाव टाकण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.
संजय राऊत यांनी एका नेत्यामार्फत हा संदेश देण्यात आल्याचे सांगितले. तसेच या प्रकरणामुळे देशातील कायदा आणि संविधान धोक्यात असल्याचेही त्यांनी म्हटले. त्यांच्या आरोपांनंतर राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
Published on: Jun 17, 2026 12:02 PM
काँग्रेस कार्यालयात राष्ट्रवादीची थेट घुसखोरी; आधी माफी मागा म्हणत...
विमान हवेत असतानाच छताला तडा...प्रवाशांचा जीव मुठीत; एअर इंडियाच्या...
तर तुम्हाला गुंगी गुडिया म्हणणे योग्यच आहे!; सपकाळांचा सुनेत्रा...
ओमराजे, सचिन अहिर थेट लोकसभा अध्यक्षांच्या भेटीला; इतर खासदार...

