Bhaskar Jadhav : भास्कर जाधवांची ठाकरेंच्या सेनेवर नाराजी? निवृत्ती घेणार? जाहीर नाराजी, बघा काय व्यक्त केली खदखद
मंत्रीपद न मिळाल्याने ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधवांनी दुसऱ्यांदा उघडपणे नाराजी बोलून दाखवली. राजकारणातून निवृत्त होण्याचेही भास्कर जाधवांनी संकेत दिले. निवृत्तीच्या वक्तव्याने भास्कर जाधव ठाकरेंच्या शिवसेनेत नाराज असल्याच्या चर्चा रंगल्यात.
2019 मध्ये ठाकरेंच्या सरकारमध्ये भास्कर जाधवांना मंत्रीपद मिळालं नव्हतं. आठ वेळा आमदारकी मिळून देखील जाधव मंत्रीपदापासून मात्र वंचित राहिले. मंत्रीपद न मिळाल्याने भास्कर जाधव यांनी दुसऱ्यांदा उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. दुसरीकडे भास्कर जाधव यांनी राजकारणातून निवृत्त होण्याचा विचारही बोलून दाखवला आहे. ‘मला मंत्रीपद मिळायला पाहिजे होतं हे तेव्हाही बोललो आजही बोलतो उद्याही बोलेन. मंत्रीपद मिळालं नाही म्हणून मी रडत बसलो नाही. मंत्रीपद मिळालं नाही म्हणून जे कोणी फुटून गेले त्यांच्याबरोबर पण मी गेलो नाही. मी लढतोय’, असं म्हणत भास्कर जाधवांनी खदखद व्यक्त केली. तर पुढे भास्कर जाधव असेही म्हणाले, पवारांची साथ सोडली हा निर्णय चुकीचा होता असंही भास्कर जाधव म्हणाले. ‘शरद पवार साहेबांना मी साथ सोडली त्यामुळे मला काहीतरी चुकल्यासारखं वाटतंय असा अजिबात त्याचा अर्थ नाही आणि मी त्याच स्पष्टीकरण केलेलं आहे. मी ती निर्णय घेतला तो चुकीचा होता हे स्पष्टपणे मी बोललो काही लपून छपून काही बोलले नाही. पण याचा अर्थ मला त्याची आता खंत वाटत, असं अजिबात नाही

तुमच्यापेक्षा जास्त बोलता येत; सरकारची लाज काढली, गुलाबराव पाटील भडकले

'त्या' प्रकरणावरून दमानिया भडकल्या अन् सरकारला केली कळकळीची विनंती

डबल डेक्करला आग अन् प्रवाशांनी बसमधून घेतल्या उड्या, थरारक व्हिडीओ

अद्भूत... आंबोलीतील सौंदर्य, डोळ्यांचे पारणं फेडणारा नजारा एकदा बघाच
