Ashok Kharat Case Enquiry | शिवनिका ट्रस्ट प्रकरणी SIT स्थापन; ट्रस्टींवरही येणार तपासाचा फेरा
भोंदूबाबा अशोक खरात याच्याशी संबंधित शिवनिका ट्रस्ट प्रकरणाला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे. या ट्रस्टच्या कामकाजावर विशेष तपास पथकाकडून (SIT) चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, ट्रस्टमधील सर्व ट्रस्टींचीही कसून चौकशी केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.
भोंदूबाबा अशोक खरात याच्याशी संबंधित शिवनिका ट्रस्ट प्रकरणाला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे. या ट्रस्टच्या कामकाजावर विशेष तपास पथकाकडून (SIT) चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, ट्रस्टमधील सर्व ट्रस्टींचीही कसून चौकशी केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. या ट्रस्टच्या विश्वस्त मंडळात काही मान्यवर व्यक्तींचाही सहभाग असल्याचे सांगितले जात असून, त्यामध्ये महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा यांचाही समावेश असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास अधिक व्यापक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच, चाकणकर यांच्याही भूमिकेची चौकशीच्या अनुषंगाने तपासणी होऊ शकते. अशोक खरात याच्यावर अनेक महिलांच्या शोषणाचे गंभीर आरोप आहेत. तो शिवनिका ट्रस्टच्या माध्यमातून गैरप्रकार करत असल्याचे आरोप केले आहे. पोलिसांनी खरातला अटक केल्यानंतर या प्रकरणाची तीव्रता अधिक वाढली आहे. दरम्यान, खरातला अटक झाल्यानंतर शिवनिका ट्रस्टच्या कार्यालयाबाहेर लावण्यात आलेला विश्वस्त मंडळाचा फोटो अचानक गायब झाल्याचेही निदर्शनास आले आहे. या घडामोडींमुळे प्रकरणातील संशय अधिक गडद होत असून, SIT चौकशीतून अनेक धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता आहे. या प्रकरणाकडे राज्यभरातून लक्ष लागले असून, तपासातून नेमके काय समोर येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Published on: Mar 23, 2026 08:09 PM
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप,
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण...
पंतप्रधानांच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ!
सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; काय घडलं?

