“हाच लबाड कोल्हा शिवसेनेतून मोठा झाला” शिवाजी आढळराव पाटलांचा खासदार अमोल काल्हेंना टोला

"कोल्हेंनी स्वताची लायकी पाहून वक्तव्य करावं..हाच लबाड कोल्हा शिवसेनेतूनच मोठा झाला आणि आता त्याच शिवसेनेवरच बोलायचे हा माणसातील गुणधर्म आहे का..?", असा सवाल शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केला.

पुणे जिल्ह्यात महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमुळेच आघाडीतील बिघाडी सुरु झालीय. त्यातच बाह्यवळणाच्या उद्घाटनप्रसंगी जाहीर वक्तव्यानंतर बिघाडीचं चित्र जाहिरपणे केलं गेलं.महाविकास आघाडीत तीन पक्ष एकत्र असताना बाह्यवळणाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्र्यांना डावलं गेलं.अन जाहीर कार्यक्रमात थेट मुख्यमंत्र्यांना खासदार कोल्हेंनी लक्ष केलं. “कोल्हेंनी स्वताची लायकी पाहून वक्तव्य करावं..हाच लबाड कोल्हा शिवसेनेतूनच मोठा झाला आणि आता त्याच शिवसेनेवरच बोलायचे हा माणसातील गुणधर्म आहे का..?”, असा सवाल शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केला. राजकारण खालच्या पातळीवर जाऊन तरुण आणि म्हतारे असं समीकरण जोडून लोकांची दिशाभूल केलीय जातीय. मात्र मी म्हातारा जरी असलो तरी माझ्याकडे बुद्धीमता, समज आहे. यांच्यासारखं नटसम्राटासारखं नाही असं म्हणत अनेक मुद्द्यावरुन खासदार अमोल कोल्हेंना शिवाजीराव आढळरावांनी लक्ष केलय.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI