Sanjay Raut : दसरा मेळाव्यात राज-उद्धव युतीची घोषणा होणार? राऊतांनी दिले मोठे संकेत, म्हणाले…
संजय राऊत यांनी दसरा मेळाव्याला राज आणि उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य राजकीय युतीचे संकेत दिले आहेत. वैचारिक सोन्याचे आदान-प्रदान होऊ शकते, असे राऊत म्हणाले. यावर महायुतीने प्रतिक्रिया दिली की ठाकरे बंधू एकत्र आले तरी त्यांच्या यशावर कोणताही परिणाम होणार नाही.
दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य युतीची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. संजय राऊत यांनी दसऱ्याला वैचारिक सोन्याचे आदान-प्रदान होऊ शकते, असे विधान केल्याने या चर्चांना अधिक बळ मिळाले आहे. राऊत यांच्या मते, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन बंधू अनेक विषयांवर चर्चा करत असून एकमेकांशी संवाद साधत आहेत. त्यांच्या एकत्र येण्याला त्यांनी सकारात्मक गोष्ट म्हटले आहे. या संभाव्य युतीवर महायुतीने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
महायुतीचे म्हणणे आहे की, ठाकरे बंधू किंवा महाविकास आघाडीतील इतर घटक पक्ष एकत्र आले तरी महायुतीला कोणताही फरक पडणार नाही. महायुती मुंबईसह राज्यातील सर्व महानगरपालिकांवर आपला भगवा फडकवण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुतीवर लोकांचा विश्वास असून, दोन महिन्यांत दूध का दूध, पाणी का पाणी होईल, असे महायुतीतील नेत्यांनी म्हटले आहे.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

