Sanjay Raut | मुख्यमंत्र्यांच्या विधानावर संजय राऊत, जयंत पाटील यांची प्रतिक्रिया

संजय राऊत यांनी मीडियाशी बोलताना हे आवाहन केलं आहे. ज्यांना कुणाला आमच्याबरोबर यायचं असेल त्यांनी यावं आणि भावी व्हावं. आजी सहकारी व्हावं. जे माजी आहेत ते आजी होतील. त्यामुळे तुम्ही त्याला भूकंप वगैरे म्हणू नका, असं राऊत म्हणाले.

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना भावी सहकारी म्हटल्यानंतर आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी विरोधकांना खुली ऑफर दिली आहे. ज्यांना कुणाला आमच्यासोबत यायचं त्यांनी खुशाल यावं आणि भावी व्हावं, असं आवाहनच संजय राऊत यांनी केलं आहे. संजय राऊत यांनी मीडियाशी बोलताना हे आवाहन केलं आहे. ज्यांना कुणाला आमच्याबरोबर यायचं असेल त्यांनी यावं आणि भावी व्हावं. आजी सहकारी व्हावं. जे माजी आहेत ते आजी होतील. त्यामुळे तुम्ही त्याला भूकंप वगैरे म्हणू नका, असं राऊत म्हणाले. संजय राऊत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होऊ शकतात, असं विधान पाटील यांनी केलं होतं. त्यांच्या या विधानाचा त्यांनी समाचार घेतला. अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होऊ शकतो ना. मराठी माणूस काहीही होऊ शकतो. जर महाराष्ट्राला माहीत नसताना चंद्रकांत पाटील मंत्री होऊ शकतात तर राऊत आणि शिवसैनिक कोणत्याही पदावर जाऊ शकतात, असा टोला त्यांनी लगावला.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI