SRA घोटाळ्याप्रकरणी किशोरी पेडणेकर आणि मुलगा यांना अटक की दिलासा? कोर्टाचे आदेश काय?

महेश पवार, Tv9 मराठी

|

Updated on: Jan 28, 2023 | 8:52 AM

उद्धव ठाकरे गटाच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, त्यांचा मुलगा साईप्रसाद आणि अन्य ३ जणांविरोधात SRA घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या ( KIRIT SOMAIYA ) यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर ( KISHORI PEDNEKAR ) यांच्यावर SRA घोटाळ्याचा आरोप केला होता. त्याविरोधात त्यांनी किशोरी पेडणेकर, त्यांचा मुलगा साईप्रसाद आणि अन्य ३ जणांविरोधात गुन्हाही दाखल केला होता.

मात्र, SRA घोटाळ्याप्रकरणी किशोरी पेडणेकर आणि मुलगा साईप्रसाद यांना कोर्टाकडून अटकपूर्व जामीन मिळाला आहे. या कथित प्रकरणातील अन्य ३ आरोपीनाही कोर्टाने अंतरिम संरक्षण दिले आहे. यामुळे किशोरी पेडणेकर यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI