शिवसेनेला महाविकास आघाडीत कायमच दुय्यम वागणूक, तानाजी सावंतांची नाराजी
महाविकास आघाडीच्या सत्तेला अडीच वर्षे लोटली. मात्र, महाविकास आघाडीत सर्वकाही आलबेल नसल्याचं सातत्यानं पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा ताणाजी सावंत यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे.
सोलापूर : महाविकास आघाडीच्या सत्तेला अडीच वर्षे लोटली. मात्र, महाविकास आघाडीत सर्वकाही आलबेल नसल्याचं सातत्यानं पाहायला मिळत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडून सरकार पाच वर्षे टिकेल असा दावा केला जातो. मात्र, तिन्ही पक्षाचे नेते आणि आमदारांकडून एकमेकांवर कुरघोडीचं राजकारण सुरुच आहे. शिवसेनेच्या अनेक आमदारांनी अनेकदा खासगीत आणि कही जाहीरपणेही निधीवाटपाबाबत खंत व्यक्त केली आहे. आताही शिवसेना आमदार आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांनी सोलापुरात जाहीरपणे नाराजी व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसवर जोरदार निशाणाही साधलाय. ‘राष्ट्रवादीचा ग्रामपंचायत सदस्यही कोटी रुपये आणतो आणि आमच्या छातीवर नाचतो. आम्हाला केवळ गोड बोललं जातं’, अशा शब्दात तानाजी सावंत यांनी जाहीर नाराजी व्यक्त केलीये.
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?

