Sanjay Raut | शस्त्र कधी, कुठे काढायची असतात, हे मुख्यमंत्र्यांच्या आजच्या भाषणातून कळेल – संजय राऊत
शिवसेना कोणती भूमिका घेणार हे पूर्ण देश समजून घेऊ इच्छत आहे. शिवसेना राष्ट्रीय राजकारणात आहेच. आगामी निवडणुकीत आमचे 22 खासदार असतील. 2025 नंतर शिवसेना देश पातळीवरील राजकारणात केंद्रस्थानी असेल," असे संजय राऊत म्हणाले.
मुंबई : राज्याची सत्ता हाती आल्यापासून शिवसेनेने आपल्या विस्तारासाठी प्रयत्न सुरु केलेला आहे. राज्य तसेच राष्ट्रीय राजकारणात आपलं स्थान बळकट करण्यासाठी शिवसेनेकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी तसेच केंद्रीय पातळीवरच्या नेत्यांशी संपर्क वाढवलेला आहे. तसेच पक्षविस्तारासंदर्भात ते वेगवेगळी विधानं करताना दिसतात. आज दसऱ्यानिमित्त बोलताना त्यांनी अनेक सूचक वक्तव्ये केली. शिवसेना राष्ट्रीय राजकारणात आहेच. भविष्यात आमचे 22 खासदार होतील, असं भाकित त्यांनी वर्तवलं आहे.
Published on: Oct 15, 2021 11:13 AM
Latest Videos
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....

