“मुंबईत दुर्घटनांची दरड कोसळली ती अनैसर्गिक पावसामुळेच, काहीही झालं की महापालिकेच्या नावाने बोटं मोडणाऱ्यांनी हे लक्षात घ्या”

पावसाळ्यापूर्वी आणि प्रत्यक्ष मुसळधार पाऊस कोसळतो तेव्हा प्रशासनातर्फे आवश्यक खबरदारी घेतली जात असते. तरीही कधीकधी 'अनैसर्गिक' पावसाचा 'दगाफटका' होतो, असंही अग्रलेखात म्हटलंय.

शनिवारच्या (17 जुलैच्या) मध्यरात्री मुंबईत दुर्घटनांची ‘दरड’ कोसळली ती अनैसर्गिक पावसामुळेच. मुंबईत पावसाने काही झाले की मुंबई महापालिकेच्या नावाने बोटे मोडणाऱ्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे, असं म्हणत आजच्या सामना अग्रलेखातून  शिवसेनेने टीकाकारांना उत्तर देण्याचा प्रयत्न केलाय. पावसाळ्यापूर्वी आणि प्रत्यक्ष मुसळधार पाऊस कोसळतो तेव्हा प्रशासनातर्फे आवश्यक खबरदारी घेतली जात असते. तरीही कधीकधी ‘अनैसर्गिक’ पावसाचा ‘दगाफटका’ होतो, असंही अग्रलेखात म्हटलंय.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI