बांगलादेशातील हिंदूंना वाचविण्यासाठी मोदींनी तातडीने पावलं उचलावीत : संजय राऊत

ज्या भारताने जगाच्या नकाशात बांगलादेश नावाच्या नवीन राष्ट्राला स्थान मिळवून दिले, त्याच बांगलादेशातील धर्मांध मुस्लिमांनी हिंदू धर्मीयांवर हल्ले चढवून, हिंदूंची हत्याकांडे घडवूनभारताचे उपकाराचे असे पांग फेडावेत, हे संतापजनक आहे.

मुंबई :  ज्या भारताने जगाच्या नकाशात बांगलादेश नावाच्या नवीन राष्ट्राला स्थान मिळवून दिले, त्याच बांगलादेशातील धर्मांध मुस्लिमांनी हिंदू धर्मीयांवर हल्ले चढवून, हिंदूंची हत्याकांडे घडवूनभारताचे उपकाराचे असे पांग फेडावेत, हे संतापजनक आहे. इनफ इज इनफ …असा कठोर संदेश देऊन बांगलादेशातील हिंदूंना वाचविण्यासाठी केंद्रीय सरकारने तातडीने पावले उचललीच पाहिजेत, अशी मागणी आजच्या सामना अग्रलेखातून करण्यात आली आहे.

ज्यांनी तुमच्यावर उपकार केला, त्यांचे असे पांग फेडणार

बांगलादेशात गेले आठ-दहा दिवस हिंदू धर्मीयांवर धर्मांध मुस्लिमांनी जे अमानुष हल्ले चढविले ते अस्वस्थ करणारे तर आहेतच, पण चीड आणणारेही आहेत. ज्या बांगलादेशची हिंदुस्थानने पाकिस्तानच्या राक्षसी अत्याचारांतून सुटका केली आणि ‘पूर्व पाकिस्तान’ हे नाव कायमचे बदलून ‘बांगलादेश’ नावाचे नवे बाळ जन्माला घातले, त्या भारताचे आणि हिंदू धर्मीयांचे बांगलादेशातील धर्मांध मुस्लिमांनी असे पांग फेडावेत, याला काय म्हणावे?

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI