मंत्रिमंडळ विस्तार झाला अन् अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
महायुतीच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तर काही वरिष्ठ आणि ज्येष्ठ नेत्यांना वगळण्यात आले त्यामुळे अनेकांमध्ये नाराजी आहे. त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार हे गेल्या २४ तासांपासून नॉट रिचेबल आहेत. यावर आता एका मोठ्या नेत्याने गौप्यस्फोट केला आहे.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर महायुती सरकारामध्ये नाराजीनाट्य पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आल्याने ते नाराज झाले आहेत. महायुतीच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तर काही वरिष्ठ आणि ज्येष्ठ नेत्यांना वगळण्यात आले त्यामुळे अनेकांमध्ये नाराजी आहे. त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार हे गेल्या २४ तासांपासून नॉट रिचेबल आहेत. यावर आता एका मोठ्या नेत्याने गौप्यस्फोट केला आहे. ‘माझ्या माहितीप्रमाणे काल अजित पवार हे पूर्ण दिवस त्यांच्या बंगल्यावरच होते. पण तरी देखील त्यांच्या बंगल्याबाहेर बोर्ड लावण्यात आला होता की, दादा उपलब्ध नाहीत. छगन भुजबळ यांच्या रागाला बळी पडायला नको. छगन भुजबळांचा राग ओढवून घ्यायला नको. जर भुजबळ समोरासमोर आले तर त्यांचा राग उफाळून आला आणि भूजबळ कोणत्या थराला जातील हे सांगता येणं कठीण असल्यामुळे अजित पवार काल नॉटरिचेबल असतील’, असं वक्तव्य भास्कर जाधव यांनी करत मोठा गौप्यस्फोट केला आहे. तर छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात मंत्रिपद न दिल्याने त्यांनी बंडाचे संकेत दिल्याचे पाहायला मिळाले. यासंदर्भात बोलताना भास्कर जाधव म्हणाले, छगन भुजबळ या वयात काय बंड करणार? जर बंड करायचं असते तर त्यांनी आधीच केलं असतं. पण आता ते काय बंड करणार, त्यांचे वय होऊन गेले. त्यामुळे त्यांना मंत्रिपद मिळालेलं नसल्याचे त्यांनी म्हटले.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

