‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न द्या’, ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची मागणी
'बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने देशाला हिंदुत्ववादी विचार दिलेत. आज स्वतःला हिंदुत्ववादी म्हणणाऱ्या सरकारने हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न द्यावा'
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न देण्याची मागणी ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे. ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न देण्याची मागणी केली आहे. ‘बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने देशाला हिंदुत्ववादी विचार दिलेत. आज स्वतःला हिंदुत्ववादी म्हणणाऱ्या सरकारने हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न द्यावा’, असे म्हणत अरविंद सावंत यांनी ही मोठी मागणी केली आहे. शिवसेनेच्या स्थापनेपासून शिवसेनेने बरीच संकंट पाहिलीत. जय-पराजय पाहिलेत. त्यातून शिवसेना पुन्हा फिनिक्स पक्षाप्रमाणे उभी राहिली आहे. म्हणून संकट हीच संधी असल्याचे समजून शिवसेना पक्ष नेहमी काम करत आलाय. त्याच शिवसेनेने देशाला हिंदुत्ववादी विचार काय? हे दाखवून देणारे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आहेत. तर आता राज्यात स्वतःला हिंदुत्ववादी म्हणणारं सरकार आहे. त्यामुळे त्यांनी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा सन्मान भारतरत्न पुरस्कार देऊन केलाच पाहिजे, अशी आमच्या पक्षाची आग्रही मागणी असल्याचे अरविंद सावंत म्हणाले. तर “अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांना शिवसेनेतर्फे आवाहन आहे, हिंदू ह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा ‘भारतरत्न’ पुरस्काराने गौरव करा, ही शिवसेनेची मागणी आहे, तर तुम्ही खरे. हिंदू ह्द्ययसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न पुरस्कार मिळायलाच पाहिजे” अशी मागणी संजय राऊत यांनी केली.

“त्यांनी राज्याची वाय झेड..”, सुरक्षेवरून राऊत अन् महायुतीमध्ये जुंपली

ठाकरेंना मशाल देणाऱ्या शिवसैनिकानं साथ का सोडली? नेत्यांची नावं घेत..

'राऊतांनी कुंभमेळ्यात साबणाचं दुकान...', 'त्या' टीकेवरून मनसेचा टोला

'..म्हणून काहीही वक्तव्य करणार का?', कोर्टानं रणवीर अलाहबादियाला झापलं
