Sanjay Raut : राज ठाकरेंसोबत दिल से नातं जोडणार… मनसे आणि ठाकरेंच्या सेनेच्या युतीवर संजय राऊतांचं मोठं विधान
पडद्याच्या काही नाड्या असतात त्या तुमच्या हातात नाही. त्या आमच्याच हातात आहे. पण पडदा कधी उघडायचा हे दोन्ही ठाकरे भाऊ म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे ठरवतील असे संजय राऊत युतीसंदर्भात म्हणाले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत दिलसे युती करणार असं संजय राऊत यांनी म्हटल्याचे समोर आलं आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चादरम्यान संजय राऊत यांनी ही स्पष्टोवक्ती दिली आहे. मनसे सोबतच्या युतीनंतर नात्याचीही जोड देणार असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. मनसेशी युती करण्यासाठी उद्धव ठाकरेंची दिल से भूमिका असल्याचे वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. ‘आम्ही स्वतः उद्धव ठाकरे आणि शिवसेना राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत नातं जोडयला आमची सकारात्मक भूमिका ठेवली आहे. उद्धव ठाकरे यांची ही मनसे आणि दिलसे भूमिका आहे. कारण मराठी माणसाचं अहित होता कामा नये. मराठी माणसाच्या मनात काही योजना असतील आणि इच्छा असतील तर त्यासाठी आम्हाला मागे हटता येणार नाही’, असे संजय राऊत म्हणाले.