AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

tv9 Marathi Special Report | धक्कादायक... फळांना लावलं चक्क उंदिर मारण्याचं औषध, भयंकर प्रकाराने मुंबईकर हादरले

tv9 Marathi Special Report | धक्कादायक… फळांना लावलं चक्क उंदिर मारण्याचं औषध, भयंकर प्रकाराने मुंबईकर हादरले

| Updated on: Feb 26, 2026 | 11:38 AM
Share

मुंबईत औषधांवरील नियमांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मालाड भागातील फळांवर उंदीर मारण्याचे औषध लावल्याचा प्रकार पाहायला मिळाला आहे, ज्यामुळे अन्न सुरक्षा आणि महापालिकेच्या कारभारावरही टीका होत आहे. उंदरांनी फळं खाऊ नयेत म्हणून हे औषध लावल्याचा अजब दावा या फळविक्रेत्याने केला आहे.

मुंबईत औषधांवरील नियमांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मालाड भागातील फळांवर उंदीर मारण्याचे औषध लावल्याचा प्रकार पाहायला मिळाला आहे, ज्यामुळे अन्न सुरक्षा आणि महापालिकेच्या कारभारावरही टीका होत आहे. उंदरांनी फळं खाऊ नयेत म्हणून हे औषध लावल्याचा अजब दावा या फळविक्रेत्याने केला आहे. मात्र हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच मनसे कार्यकर्त्यांनी त्वरित कारवाई करत फळ विक्रेत्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. या घटनेमुळे मुंबईत अन्न आणि औषध प्रशासन तसेच महापालिकेच्या देखरेखीवर प्रश्न उपस्थित झाला आहे. “हे प्रकार खुलेआम सुरू असताना प्रशासन काय करत आहे?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे.

Published on: Feb 26, 2026 11:38 AM