Amravati : धक्कादायक… कोवळ्या वयातच मातृत्व, 9 महिन्यांत 60 अल्पवयीन मुली बनल्या माता, कारणं नेमकी काय?
अमरावती जिल्ह्यात जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यांच्या कालावधीत 60 अल्पवयीन मुलींची प्रसूती झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बालविवाह आणि लैंगिक अत्याचार ही यामागची प्रमुख कारणे आहेत. मेळघाटासारख्या आदिवासीबहुल भागात शिक्षणाच्या अभावामुळे हे प्रमाण वाढले आहे. रुग्णालय प्रशासनाने या प्रकरणाची माहिती पोलीस आणि महिला व बाल विकास विभागाला दिली आहे.
अमरावती जिल्ह्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. नऊ महिन्यांच्या कालावधीत, जानेवारी ते सप्टेंबर या काळात, 18 वर्षांखालील 60 अल्पवयीन मुलींची प्रसूती झाली आहे. अमरावती येथील जिल्हा स्त्री सामान्य रुग्णालयात या कुमारिकांची प्रसूती झाल्याचे समोर आले आहे. या गंभीर प्रकारामागे बालविवाह आणि लैंगिक अत्याचार ही प्रमुख कारणे असल्याचे दिसून येते.
कोवळ्या वयातच मातृत्व लादले जाण्याच्या या घटनांमुळे सामाजिक चिंतेत भर पडली आहे. विशेषतः अमरावती जिल्ह्यातील मेळघाट हा आदिवासीबहुल भाग असून, या ठिकाणी शासनाच्या योजना अजूनही पोहोचल्या नसल्याचे म्हटले जाते.
शिक्षणाचा अभाव हे देखील याचे एक महत्त्वाचे कारण मानले जात आहे. रुग्णालय प्रशासनाने या संपूर्ण प्रकरणाची माहिती पोलीस तसेच महिला व बाल विकास विभागाला दिली आहे. या आकडेवारीने बालविवाह आणि अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या गंभीर प्रश्नाकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले आहे.
या औलादी माझ्या मुळावर, आता मी सांगतो.. इंदुरीकरांचं थेट चॅलेंज काय?
10 हजारामुळ महिलानी पटलवला गेम? बिहारवर पवारांचा तर्क अन् आयोगाला सवाल
मविआत फूट, काँग्रेस स्वतंत्र लढणार... मुंबईत फायदा महायुतीचाच?
अजित पवार अन् शाह यांची भेट, पार्थ पवार यांचा अँगल? चर्चांना उधाण

