Solapur Crime : शांत बसला काही कळायच्या आत स्वतःच्याच डोक्यात झाडली गोळी अन्.. आठवीच्या विद्यार्थ्याचं टोकाचं पाऊल
दोन दिवसांपूर्वी मुंबईत देखील असाच एक प्रकार घडला आहे. मुंबई पोलीस दलातील एका हवालदाराच्या मुलानं आत्महत्या केली. हर्ष म्हस्के असे या 20 वर्षांच्या तरुणाचं नाव आहे, त्याने आपल्या वडिलांच्या सर्व्हिस रिवॉल्व्हरमधून गोळ्या झाडून आत्महत्या केली होती.
दोन दिवसांपूर्वी मुंबईत घडलेला प्रकार सोलापुरात घडला आहे. मुंबई पोलीस दलातील एका हवालदाराच्या मुलानं आपलं जीवन संपवलं होतं. हर्ष म्हस्के असे या 20 वर्षांच्या तरुणाचं नाव आहे, त्याने आपल्या वडिलांच्या सर्व्हिस रिवॉल्व्हरमधून गोळ्या झाडून आत्महत्या केली होती. सोलापुरातील माढा येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. माढ्यातील आढेगावमध्ये इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनं टोकाचं पाऊल उचललं आहे. वय वर्ष चौदा असणाऱ्या या मुलाने स्वतःच्याच डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान श्रीधरने नेमकी आत्महत्या का केली? याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये. मात्र सोलापूरच्या माढ्यातील आढेगावमध्ये या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. श्रीधर गणेश नष्टे असं आत्महत्या केलेल्या मुलाचं नाव असल्याची माहिती मिळतेय. तर स्वतःच्याच हाताने डोक्यात गोळी झाडून आपलं आयुष्य संपवणाऱ्या मुलाचे वडीले गणेश नष्टे हे सीमा सुरक्षा दलात कार्यरत आहेत. त्यांचीच ही बंदूक आहे. या बंदुकीचं लायन्सस जम्मू काश्मीरचं आहे. त्याने आपल्या वडिलांची बंदूक घेतली. शांतपणे खुर्चीवर बसला आणि काही कळायच्या आतच स्वत:च्या डोक्यात गोळी झाडल्याचे सांगितले जात आहे.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!

