Anjali Damania Video : ‘राजकीय रंग असलेली व्यक्ती…’, कराडला ICU मध्ये ठेवणारा डॉक्टर वादाच्या भोवऱ्यात; दमानियांकडून गंभीर आरोप
डॉ. अशोक थोरात यांनी दिलेल्या सरपंच देशमुखांच्या पोस्टमार्टमवर दमानिया यांनी शंका व्यक्त केली आहे. सिव्हिल सर्जन डॉ. अशोक थोरात यांच्यावर २४ आरोप असल्याचे म्हणत त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणीही दमानिया यांनी केली आहे.
सरपंच संतोष देशमुख यांचा पोस्टमार्टम रिपोर्ट देणाऱ्या डॉ. अशोक थोरात यांच्यावर समाजसेविका अंजली दमानिया यांनी गंभीर आरोप केलेत. डॉ. अशोक थोराप यांनी संतोष देशमुख यांचा पोस्टमार्टम रिपोर्ट योग्य दिला का? असा सवालही यावेळी अंजली दमानिया यांनी उपस्थित केला. दरम्यान, वाल्मिक कराडवर सुद्धा याच डॉ. अशोक थोरात यांनी उपचार केल्याचे सांगितले जात आहे. याच डॉ. अशोक थोरात यांनी दिलेल्या सरपंच देशमुखांच्या पोस्टमार्टमवर दमानिया यांनी शंका व्यक्त केली आहे. ‘डॉ. अशोक थोरात यांच्यावर धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडची कृपा आहे. तर काहीही गरज नसताना वाल्मिक कराडला हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आलं.’, असं दमानिया यांनी म्हटलंय तर सिव्हिल सर्जन डॉ. अशोक थोरात यांच्यावर २४ आरोप असल्याचे म्हणत त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणीही दमानिया यांनी केली आहे. धनंजय मुंडेंच्या कृपेने आणि वाल्मिक कराडच्या कृपेने त्यांची बदली पुन्हा बीडमध्ये झाली. आम्हाला काल त्यांच्या एका मोठ्या हॉटेलबद्दल कळलं आणि ते लक्झरी हॉटेल आहे अंबेजोगाईला, ते बघून थोडासा धक्का बसला, असं अंजली दमानिया यांनी म्हटलं तर ही व्यक्ती जर संतोष देशमुख यांच्या पोस्टमार्टम रिपोर्टची सगळी डिटेल्स देणार असेल, तर यांनी योग्य कारवाई केली की नाही अशी शंका मनात येते. कारण हे जेवढे भ्रष्ट लोक आहेत ना, ते पैशासाठी वाटेल ते करतात, असं म्हणत दमानिया यांनी हल्लाबोल केला आहे.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक

