चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याकडं दुर्लक्ष करणं महाराष्ट्राच्या हिताचं, संजय राऊतांचं वक्तव्य
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्याला पुढं घेऊन जात आहेत. देशात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं नाव पहिल्या पाचमध्ये येत आहे, त्यामुळं विरोधकांचं दु: ख मी समजू शकतो, अशा शब्दात संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे.
चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याकडं दुर्लक्ष केलं पाहिजे. महाराष्ट्रापुढं अनेक प्रश्न आहेत त्यावर काम करण्याची गरज आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्याला पुढं घेऊन जात आहेत. देशात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं नाव पहिल्या पाचमध्ये येत आहे, त्यामुळं विरोधकांचं दु: ख मी समजू शकतो, अशा शब्दात संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या वक्तव्यांकडे दुर्लक्ष करणं महाराष्ट्राच्या हिताचं आहे. शिवसेना प्रमुखांपासून उद्धव ठाकरेंपर्यंत कोणीही पाठीत खंजीर खुपसलेला नाही.बंद दाराआड काय झालं होतं आणि तिथून काय घडलं यात जास्त खोलात जायला नको. महाराष्ट्राच्या जनतेला आता मदतीची गरज आहे, असं संजय राऊत म्हणाले.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

