Monkeypox | मंकीपॉक्स महामारी ठरणार? WHO च्या इशाऱ्याने जगात खळबळ

| Updated on: May 29, 2022 | 9:45 AM

कोरोनाचे संकट कमी झालेले नसतानाच आता मंकीपॉक्स नावाच्या आजाराने जगात खळबळ उडून दिली आहे. आतापर्यंत जगभरात एकूण 219 जणांना मंकीपॉक्सची लागण झाली आहे.

Monkeypox |  मंकीपॉक्स महामारी ठरणार? WHO च्या इशाऱ्याने जगात खळबळ
Image Credit source: social media
Follow us on

कोरोनाचे संकट कमी झालेले नसतानाच आता मंकीपॉक्स नावाच्या आजाराने जगात खळबळ उडून दिली आहे. मंकीपॉक्स महामारी ठरणार का असा प्रश्न निर्माण होत आहे कारण तसा इशारा जागतिक आरोग्य संघटनेकडून देण्यात आला आहे.  जगात आतापर्यंत मंकीपॉक्सचे एकूण 219 रुग्ण आढळून आले आहेत. सुमारे 20 देशांमध्ये मंकीपॉक्सचे रुग्ण आढळून आले आहेत. सुदैवाने आतापर्यंत भारतात या आजाराचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही.