AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Anna Hazare :  अण्णा आता तरी उठा! कुंभकर्ण सुद्धा गाढ झोपेतून.. पुण्यातील 'त्या' बॅनरची भानगड तरी काय?

Anna Hazare : अण्णा आता तरी उठा! कुंभकर्ण सुद्धा गाढ झोपेतून.. पुण्यातील ‘त्या’ बॅनरची भानगड तरी काय?

| Updated on: Aug 18, 2025 | 3:31 PM
Share

अण्णा आता तरी उठा! अशा आशयाचे पुण्यात बॅनर झळकल्याचे दिसताय.मतदार चोरीसह विविध आरोप होत असताना अण्णा हजारे त्यावर गप्प का? असा आशय या बॅनरमधून प्रतीत होतोय. त्यावर अण्णा हजारे यांनी काय उत्तर दिलंय?

मतदार चोरीसारखे गंभीर आरोप होत असताना अण्णा हजारे झोपेतून कधी जागे होणार? असे बॅनर पुण्यात झळकले आहेत. मतचोरी आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून या बॅनरद्वारे ज्येष्ठ गांधीवादी नेते आणि सामाजिक कार्यकर्त्या अण्णा हजारे यांनी झोपेतून उठावं असं आवाहन करण्यात आलं आहे आणि बॅनरच्या बाजूला अण्णा हजारे यांच्या निद्रावस्थेतील एक फोटोही लावला आहे. समीर बबन उत्तरकर या व्यक्तीने हे बॅनर लावले आहे. ज्यात अण्णा आता तरी उठा कुंभकरण सुद्धा गाढ झोपेतून रावणासाठी आणि लंकेसाठी उठला होता. तुम्ही आपल्या देशासाठी आता तरी उठा, असं आवाहन करण्यात आलंय.

देशात मतांची चोरी होत असताना अण्णा तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा? असा सवालही विचारला गेला आहे. (२०११-१२ ला दिल्ली येथे अण्णा हजारे यांच्या नेतृत्वात झालेला आंदोलन दिवसभर टीव्हीवर पाहिलेला एक भारतीय नागरिक) असं बॅनर लावणाऱ्यांनी स्वतःची ओळखही दिली आहे. यावर आपण वयाच्या नव्वदीत पोहोचूनही आंदोलनच करायचं आणि तुम्ही झोपून राहायचं का? असा सवाल अण्णा हजारे यांनी केला आहे.

Published on: Aug 18, 2025 03:31 PM