गौतमी पाटीलच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; गौतमी आता सिनेमात दिसणार
Gautami Patil Ghungru Movie : गौतमी पाटील आता सिनेमात झळकणार आहे. गौतमीने प्रेक्षकांना काय आवाहन केलंय? पाहा...
सोलापूर : नृत्यांगना गौतमी पाटील तिच्या डान्ससाठी सर्वत्र प्रसिद्ध आहे. पण सध्या गौतमी आणखी एका गोष्टीमुळे चर्चेत आलीये. गौतमी पाटील आता लवकरच सिनेमात दिसणार आहे. घुंगरू चित्रपटाच्या माध्यमातून गौतमी पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. माढ्यात या सिनेमाचं चित्रीकरण आता पूर्ण झालं आहे. हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. घुंगरू सिनेमा लोककलावंताची व्यथा मांडणारा आहे. त्यामुळे घुंगरू महाराष्ट्रातील प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. कलाकारांना प्रोत्साहन देण्याचं काम प्रेक्षक करत असतात. प्रेक्षकांमुळेच आज मी इथपर्यंत पोहोचली आहे. माझ्यावर जसं प्रेम केलं, तसंच घुंगरू चित्रपटावरही प्रेम करावं. हा सिनेमा पाहावा. हा माझा पहिलाच सिनेमा आहे. त्यामुळे चित्रपटात अभिनय करताना अनेक अनुभव आले, असं गौतमी पाटीलने सांगितलं.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?

