The Kerala Story च्या प्रदर्शनावरून पुण्यातील FTII मध्ये राडा, आक्रमक विद्यार्थ्यांकडून स्क्रिनिंग बंद
VIDEO | पुण्यातील FTII मध्ये विद्यार्थ्यांच्या दोन गटात राडा, मोठा पोलीस बंदोबस्त तैनात, कारण काय?
पुणे : द केरला स्टोरी (The Kerala Story) चित्रपटाच्या प्रदर्शनावरून पुण्यातील दोन गटात विद्यार्थ्यांमध्ये चांगलाच रडा झाल्याचे पाहायला मिळाले. एफ टी आय आय मधील मेन थिएटर मध्ये पुण्यातील नीती या संस्थेच्या माध्यमातून द केरला स्टोरीज या चित्रपटाच्या शोचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी एफ टी आय आय मधील काही विद्यार्थ्यांनी या शोला विरोध दर्शवत जोरदार घोषणाबाजी केली आणि हा शो बंद करण्याची मागणी केली. विशेष म्हणजे केरला स्टोरीज या चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक देखील या शोसाठी उपस्थित होते. दरम्यान, विद्यार्थ्यांकडून झालेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस फौजफाटा देखील तैनात करण्यात आला होता. मोठ्या पोलीस बंदोबस्तात हा शो पार पडला. यावेळी संस्थेतील विद्यार्थी आणि माजी विद्यार्थी संघटनेने या शोला विरोध दर्शविला. केरला स्टोरीजच्या स्क्रिनिंगआधी विद्यार्थ्यांच्या एका गटानं एफटीआयच्या परिसरात आंदोलनही पुकारलं. पण या विदयार्थ्यांच्या विरोधाला न जुमानता ‘द केरला स्टोरी’चं स्क्रीनिंग सुरु ठेवण्यात आलं.

लखनऊ विमानतळावर काय घडलं? विमानाच्या चाकातून ठिणग्या, धूर.. बघा VIDEO

मुंबईच्या गिरगावात बेस्ट बस 5 फूट खोल खड्ड्यात पडली अन्... बघा VIDEO

विमान अपघात LIVE शूट करणाऱ्या आर्यननं सांगितलं सारं काही, म्हणाला...

शरद पवारांचे आमदार अस्वस्थ, लागले सत्तेचे वेध अन पवारांसमोर मोठा पेच?
