सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात सरकारला मोठा दणका!
सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला मोठा धक्का दिला आहे. उच्च न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचा दिलेला आदेश सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. पोलिसांनी एफआयआर नोंदवला नसल्याने त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. हा निकाल भविष्यातील पोलिस कोठडीतील मृत्यूच्या प्रकरणांसाठी महत्त्वाचा आहे.
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने महायुती सरकारला मोठा दणका दिला आहे. ‘महाराष्ट्र राज्य आणि इतर विरुद्ध विजयबाई वेंकट सूर्यवंशी’ या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने सूर्यवंशी यांच्या बाजूने निकाल देत उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवला आहे. यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना या निकालाचे सविस्तर विश्लेषण केले. ते म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने आमचे म्हणणे ऐकून घेतले आणि उच्च न्यायालयाचा गुन्हा दाखल करण्याचा निर्णय कायम ठेवला. पोलिसांनी एफआयआर नोंदवला नाही, त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई होईल की नाही, हे पाहावे लागेल. उच्च न्यायालयाने याप्रकरणी एका आठवड्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश सरकारला दिले होते.
सर्वोच्च न्यायालयाने सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात गुन्हा का दाखल झाला नाही, असा प्रश्न उपस्थित केला. प्रकाश आंबेडकर म्हणाले, या प्रकरणात दुर्दैवाची बाब म्हणजे स्वतः राज्य सरकारच आरोपी आहे. सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलिस कोठडीत सरकारच्या ताब्यात असताना झाला. यापूर्वीच्या प्रकरणांप्रमाणे सरकारने याही वेळी जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही कोर्टाच्या निदर्शनास ही बाब आणली. आता उच्च न्यायालय यासंदर्भात नियम तयार करेल, ज्यामुळे भविष्यात पोलिस कोठडीतील मृत्यूंना न्याय मिळेल.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

