Special Report | वाढदिवसाच्याच्या पूर्वसंध्येला अजितदादा का संतापले?

वाढदिवसानिमित्ताने होर्डिंग्ज लावू नका, बॅनरबाजी करू नका, असं आवाहन मी केलं होतं. माझ्या सद्सदविवेकबुद्धिला स्मरून मी हे आवाहन केलं होतं. उद्याच्याला कोणी काय केलं ते चुकीचं असेल तर पोलिसांनी अॅक्शन घ्यावी. त्यांना कारवाईसाठी कधीच बंदी केलेली नाही, असं अजितदादा म्हणाले.

अजित पवार पिंपरी-चिंचवडमध्ये आले होते. उद्या त्यांचा वाढदिवस असल्याने त्यांना शुभेच्छा देणारे होर्डिंग्ज शहरात लागले आहेत. अजितदादांनी मनाई करूनही हे होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. धक्कादायक म्हणजे काही गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांनीही शुभेच्छांचे होर्डिंग्ज लावले आहेत. त्याबाबत अजित पवार यांना विचारण्यात आले. खासकरून गुन्हेगारांच्या होर्डिंग्जकडे त्यांचं लक्ष वेधण्यात आलं. त्यावेळी अजितदादा चांगलेच भडकले. गुन्हेगारांना होर्डिंग्ज लावायला मी सांगितलं होतं का? वाढदिवसानिमित्ताने होर्डिंग्ज लावू नका, बॅनरबाजी करू नका, असं आवाहन मी केलं होतं. माझ्या सद्सदविवेकबुद्धिला स्मरून मी हे आवाहन केलं होतं. उद्याच्याला कोणी काय केलं ते चुकीचं असेल तर पोलिसांनी अॅक्शन घ्यावी. त्यांना कारवाईसाठी कधीच बंदी केलेली नाही, असं अजितदादा म्हणाले.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI