Special Report | उंचीचा थरार जेव्हा थरकापात बदलतो

रायगड जिल्ह्यातील अलिबागमध्ये पॅरासेलिंगला गेलेल्या दोन मैत्रिणींसोबत एक भयावह प्रकार घडला. दोन्ही मैत्रिणी पॅरासेलिंग करत असताना त्यांच्या बचावासाठी बोटीला बांधलेला दोर तुटला आणि दोघी तब्बल 100 मीटर उंचीवरुन समुद्राच्या मध्यभागी पडल्या.

रायगड : रायगडच्या अलिबागमधून एक काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर आलाय. पॅरासेलिंग करताना किती  धोका आहे. हे या व्हिडिओमधून कळून येते. समुद्राच्या मध्यभागी एक असा प्रकार घडला आहे, ते पाहून कुणाच्याही काळजाचा ठोका चुकेल. विकेंडला सर्वजण काही ना काही भन्नाट करण्याचा प्लॅन करतात, मात्र योग्य काळजी न घेतल्यास हे किती महागात पडू शकते, कधी कधी जीवावर बेतू शकते ते या व्हिडिओने दाखवून दिलं आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबागमध्ये पॅरासेलिंगला गेलेल्या दोन मैत्रिणींसोबत एक भयावह प्रकार घडला. दोन्ही मैत्रिणी पॅरासेलिंग करत असताना त्यांच्या बचावासाठी बोटीला बांधलेला दोर तुटला आणि दोघी तब्बल 100 मीटर उंचीवरुन समुद्राच्या मध्यभागी पडल्या. यावेळी त्याच बोटीत असलेल्या त्यांच्या कुटुंबीयांच्या काळजाचा ठोका चुकला. पण सुदैवानं दोन्ही महिलांनी लाईफ जॅकेट्स घातले होते, त्यामुळे बोट दोघींपर्यंत पोहचेपर्यंत लाटांवर तरंगत राहिल्य आणि बचावल्या. अलिबागच्या वर्सोली बीचवर पॅरासेलिंगवेळी 27 नोव्हेंबरला हा प्रकार घडला.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI