Special Report | पुतळ्यांवरून राजकारण नेमकं कोण करतंय?

अमरावतीतल्या राजापेठ पुलावर नवनीत राणांनी बसवलेला पुतळा हटवण्यात आला. त्यानंतर आज दर्यापूरमध्येही विनापरवानगी बसवलेला पुतळा हटवला गेला. कालच्या प्रकरणात राणा दाम्पत्यानं सरकारबरोबरच भाजपतल्या स्थानिक नेत्यांवर टीका केली आणि आजच्या प्रकरणात काँग्रेसच्या यशोमती ठाकुरांविरोधात शिवसेनेनं आंदोलन छेडलं.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: सागर जोशी

Jan 17, 2022 | 10:16 PM

अमरावतीतल्या राजापेठ पुलावर नवनीत राणांनी बसवलेला पुतळा हटवण्यात आला. त्यानंतर आज दर्यापूरमध्येही विनापरवानगी बसवलेला पुतळा हटवला गेला. कालच्या प्रकरणात राणा दाम्पत्यानं सरकारबरोबरच भाजपतल्या स्थानिक नेत्यांवर टीका केली आणि आजच्या प्रकरणात काँग्रेसच्या यशोमती ठाकुरांविरोधात
शिवसेनेनं आंदोलन छेडलं.

अमरावतीच्या दर्यापूर इथल्या पेट्रोल पंप चौकात 2 दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा बसवला गेला होता. पण त्यासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नव्हती. त्यामुळे काल रात्री 2 वाजता दर्यापूर नगरपालिकेनं पोलिसांच्या मदतीनं पुतळा हटवला. दर्यापूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष भाजपचे असले, तरी तिथं काँग्रेसच्या नगरसेवकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे पुतळा हटवण्याच्या कारवाईवर शिवसैनिकांनी पालकमंत्री यशोमती ठाकुरांना टार्गेट केलंय.

दुसरीकडे काल ठाकरेंवर टीका करताना खासदार नवनीत राणांनी भाजपच्या नगरसेवकांवर आरोप केले होते. ज्या भाजपसाठी आम्ही झटतो, त्यांच्या नगरसेवकांच्या वागणुकीबद्दल फडणवीसांना जाब विचारु, असं नवनीत राणा म्हटल्या होत्या. पण त्यावर राणा दाम्पत्यानं भाजपला मदतीचं ढोंग करु नये, असं उत्तर भाजपकडून आलंय.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें