Special Report | मुंबईकरांच्या करमाफीवरुन हंगामा! भाजप-शिवसेना आमनेसामने
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबईतील 500 चौरस फुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ करण्याची घोषणा शनिवारी करण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयावरुन आता भाजप नेते जोरदार टीका करताना पाहायला मिळत आहे. महापालिकेच्या सत्तेची खुर्ची डळमळली तेव्हाच मुंबई'करां'ची आठवण झाली, अशा शब्दात भाजप आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधलाय.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबईतील 500 चौरस फुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ करण्याची घोषणा शनिवारी करण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयावरुन आता भाजप नेते जोरदार टीका करताना पाहायला मिळत आहे. महापालिकेच्या सत्तेची खुर्ची डळमळली तेव्हाच मुंबई’करां’ची आठवण झाली, अशा शब्दात भाजप आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधलाय.
आशिष शेलार यांनी सरकारच्या निर्णयाचा चांगलाच समाचार घेतला. त्यातबरोबर त्यांनी सरकारकडे महत्वाची मागणीही केली आहे. आतापासूनच नाही तर वचन दिलेत त्या तारखेपासून 500 चौरर फुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर पूर्ण माफ करा. अती श्रीमंत सोडून ज्या मध्यमवर्गीयांची घरं 500 चौ. फु. पेक्षा मोठी आहेत, त्यांचाही 500चौ. फु. पर्यंतचा कर माफ करा? 500 चौ. फु.पर्यंतच्या दुकानदारांही हीच सुट देणार का?, असे प्रश्न शेलार यांनी विचारले आहेत.
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन

