Special Report | मुंबई – नागपूर ‘बुलेट ट्रेन’ला मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा

“रावसाहेब दानवेंना शब्द देतो, तुम्ही मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनसाठी पुढाकार घ्या, आम्ही खंबीर पाठीशी राहतो” असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी दिलं. मुख्यमंत्री महोदय पाठीशी उभे रहा, पुढचं मी बघतो, असं रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) म्हणाले होते. “मराठवाड्यात आपण आपआपसात भांडत कशाला बसायचं? नालायकपणे कारभार करुन आपणही भांडत राहिलो तर फरक काय राहिला. अपेक्षेशिवाय आयुष्य असू शकत नाही, तुम्ही आमच्याकडे आणि आम्ही तुमच्याकडे अपेक्षा व्यक्त करायच्या” असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

माझ्या राज्याच्या राजधानी आणि उपराजधानीला जोडणारा लोहमार्ग मुंबई नागपूर बुलेट ट्रेन होणार असेल, तर मी तुमच्या सोबत आहे. रावसाहेब तुम्ही प्रेझेंटेशन दिलं नाही तरी चालेल, आम्ही पाठीशी उभे राहू, असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला. रावसाहेब बऱ्याच दिवसांनी एकत्र आलेत, जुने सहकारी आहेत, गंमत-जंमत हवीच, असं म्हणत “आज सुद्धा पैसे द्यायला तुमच्यावर विश्वास ठेवतात की नाही माहीत नाही“ असा रावसाहेब दानवे यांना टोला लगावला.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI