AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Special Report | नवं वर्ष, कोरोनाचा नवा धोका!

Special Report | नवं वर्ष, कोरोनाचा नवा धोका!

| Edited By: | Updated on: Jan 01, 2022 | 11:10 PM
Share

थर्टी फर्स्ट संपला. नव्या वर्षाला सुरुवात झाली. आणि पुन्हा एकदा पहिल्याच तारखेला, कोरोनानं धडकी भरवण्यास सुरुवात केली. कारण महाराष्ट्रात 500च्या आलेली रुग्ण संख्या झपाट्यानं वाढलीय. कोरोनाच्या रुग्ण संख्येचा विस्फोट झाला आहे. मुंबईसह महाराष्ट्रात रुग्ण संख्येचा वेग अधिक असल्याचं दिसून आलंय. नव्या वर्षाला सुरुवात होताच, पुन्हा चिंता वाढण्यास सुरुवात झालीय. कारण गेल्या 5 दिवसांतच रुग्णसंख्या दुप्पट झालीय.

थर्टी फर्स्ट संपला. नव्या वर्षाला सुरुवात झाली. आणि पुन्हा एकदा पहिल्याच तारखेला, कोरोनानं धडकी भरवण्यास सुरुवात केली. कारण महाराष्ट्रात 500च्या आलेली रुग्ण संख्या झपाट्यानं वाढलीय. कोरोनाच्या रुग्ण संख्येचा विस्फोट झाला आहे. मुंबईसह महाराष्ट्रात रुग्ण संख्येचा वेग अधिक असल्याचं दिसून आलंय. नव्या वर्षाला सुरुवात होताच, पुन्हा चिंता वाढण्यास सुरुवात झालीय. कारण गेल्या 5 दिवसांतच रुग्णसंख्या दुप्पट झालीय. त्यातच देशाच्या तुलनेत सर्वाधिक रुग्णसंख्याही महाराष्ट्रातच आहे.

28 डिसेंबरला राज्यात 2 हजार 172 नव्या रुग्णांची नोंद झाली होती. त्यावेळी मुंबईत 1233 रुग्ण आढळले. 29 डिसेंबरला राज्याचा आकडा वाढला, 3900 नवे रुग्ण आढळले. तर मुंबईत 2510 नव्या रुग्णांची नोंद झाली. 30 डिसेंबरला महाराष्ट्रात कोरोनाचे 5368 रुग्ण वाढले. त्यापैकी मुंबईतच 3928 रुग्ण होते. पुन्हा 31 डिसेंबरला रुग्णांच्या संख्येत विस्फोट झाला. थर्टी फर्स्टला राज्यातली रुग्णांची संख्या 8067 इतकी झाली. त्यापैकी एकट्या मुंबईतच 5428 नवे रुग्ण आढळले. त्यामुळंच मुंबईतील बंद केलेले कोव्हिड सेंटर सुरु करण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी कोविड सेंटर सुरु करण्यासोबतत लहान मुलांसाठीचं लसीकरणासाठीही सुरुवात करत असल्याची माहिती दिली आहे.