Special Report | शिवसैनिकांचा संताप, दत्तात्रय भरणेंकडून तात्काळ दिलगिरी व्यक्त!
सोलापुरातील एका जाहीर कार्यक्रमात बागेच्या कामाबाबत बोलताना 'मुख्यमंत्री जाऊ द्या, मरु द्या' असं वक्तव्य दत्तात्रय भरणे यांनी केलं होतं. त्याबाबत दत्तात्रय भरणे यांनी दिलगिरी व्यक्त करावी अन्यथा पालकमंत्र्यांची जिभ काढून हातात देऊ, असा इशारा शिवसेना शहरप्रमुख गुरुशांत धुतरगावकर यांनी दिला होता. त्यानंतर या वादावर पडदा टाकत दत्तात्रय भरणे यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.
सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दत्तात्रय भरणे यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल केलेल्या एका वक्तव्यानंतर शिवसेना पदाधिकारी चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. सोलापुरातील एका जाहीर कार्यक्रमात बागेच्या कामाबाबत बोलताना ‘मुख्यमंत्री जाऊ द्या, मरु द्या’ असं वक्तव्य दत्तात्रय भरणे यांनी केलं होतं. त्याबाबत दत्तात्रय भरणे यांनी दिलगिरी व्यक्त करावी अन्यथा पालकमंत्र्यांची जिभ काढून हातात देऊ, असा इशारा शिवसेना शहरप्रमुख गुरुशांत धुतरगावकर यांनी दिला होता. त्यानंतर या वादावर पडदा टाकत दत्तात्रय भरणे यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री आमचे नेते आहेत. त्यांच्यावर माझे प्रेम आहे. माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला, असं दत्तात्रय भरणे यांनी म्हटलंय. आता भरणे यांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर स्थानिक पातळीवर सुरु झालेल्या या वादावर पडदा पडण्याची शक्यता आहे.
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न

