Special Report | पुण्यात भाजप-मनसेची युती? राज ठाकरेंसोबत महापौर मुरलीधर मोहोळ
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच भाजप आणि मनसे युतीचे संकेत दिले होते. तर आज एका उद्घाटन कार्यक्रमात राज ठाकरे यांच्यासोबत पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ पाहायला मिळाले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा 3 दिवसीय पुणे दौरा आज पूर्ण झाला. अशावेळी पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि मनसे युतीची चर्चा ऐकायला मिळत आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच भाजप आणि मनसे युतीचे संकेत दिले होते. तर आज एका उद्घाटन कार्यक्रमात राज ठाकरे यांच्यासोबत पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ पाहायला मिळाले. त्यामुळे आता पुण्यात महाविकास आघाडी विरुद्ध भाजप आणि मनसे युतीचा सामना पाहायला मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Latest Videos
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

