Special Report | अनिल देशमुखांचा पाय खोलात ?

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यानंतर मुलगा ऋषिकेश आणि आता पत्नी आरती यांना सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीकडून समन्स बजावण्यात आलं आहे. आरती देशमुख यांना उद्या सकाळी 11 वाजता ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यानंतर मुलगा ऋषिकेश आणि आता पत्नी आरती यांना सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीकडून समन्स बजावण्यात आलं आहे. आरती देशमुख यांना उद्या सकाळी 11 वाजता ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अनिल देशमुख यांचे वकील कमलेश घुमरे यांनी याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिलीय. आम्ही गुन्हा रद्द करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात गेलो आहोत. ईडीकडून अनेक बातम्या येत होत्या. त्यात अनेक विसंगतीही होत्या. नक्की सत्यता काय आहे? हे सांगण्यासाठीच आपण आज पत्रकार परिषद घेत असल्याचं घुमरे म्हणाले. आतापर्यंत अनिल देशमुख, आरती देशमुख, ऋषिकेश देशमुख या तीन जणांना ईडीने समन्स दिलं आहे. आरती देशमुख यांना आजचं समन्स दिलं आहे. त्या 66 वर्षांच्या आहेत. त्यांना कोरोना झाला आहे. त्यांना अनेक आजार आहेत. त्या गृहिणी आहे. त्यांचा या व्यवहाराशी काही संबंध नाही, असा दावाही घुमरे यांनी पत्रकार परिषदेत केलाय.