Special Report | अनिल परबांच्या कुंडलीचा ज्योतिषी सेनेतच?

महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यापासून शिवसेनेच्या मागे शुक्लकाष्ठ लागलं आहे. शिवसेनेचे मंत्री अनिल परब, आमदार रवींद्र वायकर, प्रताप सरनाईक यांच्यापासून ते थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंवरही घोटाळ्याचे आरोप झाले आहेत. त्यातच शिवसेनेचे नेते रामदास कदम हेच सरकार पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा मनसेच्या वैभव खेडेकर यांनी केला आहे.

राज्यात सत्ता आल्यानंतर शिवसेनेने अनेक नेत्यांना मंत्रिमंडळातून डावलले. तर भाजपशी युती तोडल्याने केंद्रातही संधी मिळत नसल्यामुळे शिवसेना नेते नाराज आहेत. त्यातूनअच त्यांच्या मनातील खदखद बाहेर येत असल्याचं सांगितलं जात आहे. अनिल परब यांचा रिसॉर्ट आणि त्यावरून रामदास कदम यांच्यावर मनसे नेते आणि खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी केलेला आरोप हा त्याचाच एक भाग असल्याचं सूत्रांनी सांगितलं. तर, भाजप सोबत शिवसेनेची युती न झाल्याने आपलं पुनर्वसन होऊ शकलं नसल्याचं शल्य अनंत गीते यांना बोचत असावं. त्यामुळेच त्यांनी काहीही वादविवाद नसताना थेट शरद पवारांवर हल्ला केला. त्यांनी मनातील खदखद व्यक्त केली. यावरून शिवसेनेत धुसफूस असल्याचं दिसतं, असं राजकीय सूत्रांनी सांगितलं.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI