Special Report | मराठा आरक्षणासाठी पुन्हा एल्गार! सरकारकडून संभाजीराजेंना चर्चेचं निमंत्रण

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी प्रतिक्रिया देताना १८ जूनला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना समन्वयकांसोबत भेटणार असल्याचं सांगितलं. मात्र, मुख्यमंत्र्यांना भेटणार असलो तरी आमचं आंदोलन सुरुच असणारी, अशी स्पष्टपणे भूमिका संभाजीराजेंनी जाहीर केली.

मराठा आरक्षणासाठी काढण्यात आलेल्या मूक मोर्चानंतर राज्य सरकारने चर्चेचं आमंत्रण दिलं आहे. यावर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी प्रतिक्रिया देताना १८ जूनला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना समन्वयकांसोबत भेटणार असल्याचं सांगितलं. मात्र, मुख्यमंत्र्यांना भेटणार असलो तरी आमचं आंदोलन सुरुच असणारी, अशी स्पष्टपणे भूमिका संभाजीराजेंनी जाहीर केली. राज्य सरकारने आम्हाला चर्चेचं निमंत्रण दिलं असून ही सकारात्मक गोष्ट आहे. त्यामुळे आम्हीही सरकारला सकारात्मक प्रतिसाद देणार आहोत. मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी जाण्याकरिता आम्हाला काही मुद्द्यांचा अभ्यास करून जावं लागणार आहे, त्यामुळे शुक्रवारी मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचं संभाजीराजे यांनी सांगितलं.