Special Report | …तर शिवसेना आमदाराकडून धमक्यांचा पाऊस सुरुच!

उद्यापासून पुन्हा एकदा राणेंची जनआशीर्वाद यात्रा सुरु होणार आहे. सिंधुदुर्गात संचारबंदी लागू केली गेली असली तरी यात्रा होणार असा दावा राणे, त्यांचे पुत्र आणि स्थानिक भाजप नेत्यांकडून करण्यात आलाय. तर यात्रेदरम्यान शिवसेनेविरोधात टीका केली तर शिवसैनिक या जनआशीर्वाद यात्रेला विरोध करेल, असा इशारा आमदार वैभव नाईक यांनी दिलाय. आम्ही सर्व नियम पाळून यात्रा काढू. ही यात्रा पुन्हा एकदा सिंधुदुर्गातून सुरु होईल आणि सिंधुदुर्गात दिमाखदार सांगता होईल, असा दावा आमदार नितेश राणे यांनी केलाय.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दलचं आक्षेपार्ह वक्तव्य, त्यानंतर राणेंना झालेली अटक आणि जामिनावर सुटका. यानंतर नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेत दोन दिवसांचा खंड पडला आहे. पण उद्यापासून पुन्हा एकदा राणेंची जनआशीर्वाद यात्रा सुरु होणार आहे. सिंधुदुर्गात संचारबंदी लागू केली गेली असली तरी यात्रा होणार असा दावा राणे, त्यांचे पुत्र आणि स्थानिक भाजप नेत्यांकडून करण्यात आलाय. तर यात्रेदरम्यान शिवसेनेविरोधात टीका केली तर शिवसैनिक या जनआशीर्वाद यात्रेला विरोध करेल, असा इशारा आमदार वैभव नाईक यांनी दिलाय. आम्ही सर्व नियम पाळून यात्रा काढू. ही यात्रा पुन्हा एकदा सिंधुदुर्गातून सुरु होईल आणि सिंधुदुर्गात दिमाखदार सांगता होईल, असा दावा आमदार नितेश राणे यांनी केलाय.

Published On - 9:42 pm, Thu, 26 August 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI