Special Report | ब्रिटनमध्ये ओमिक्रॉनचा समुह संसर्ग! भारतात काय होणार?

कम्युनिटी स्प्रेडमुळं ओमिक्रॉन व्हेरियंट, भारतातही धुमाकूळ घालणार का ?, अशी शंका उपस्थित करण्यात येतेय. कारण ब्रिटनच्या काही परिसरात ओमिक्रॉन व्हेरियंटचा समुह संसर्ग झाल्याचं समोर येतंय..यूकेचे आरोग्य मंत्री साजिद जावेद यांनी सांगितलं की, ओमिक्रॉनबाधित देशांमधून प्रवास न करताही अनेकांना कोरोनाची लागण झालीय. ब्रिटनमध्ये एकूण 336 ओमिक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. यापैकी इंग्लंडमध्ये 261 रुग्णांची नोंद झालीय. तर स्कॉटलँडमध्ये 71 तर वेल्समध्ये 4 रुग्ण आढळले आहेत.

या 336 ओमिक्रॉनच्या रुग्णांपैकी बऱ्याच रुग्णांची कोणतीही ट्रॅव्हल हिस्ट्री नाही…तरीही ते बाधित झालेत…म्हणजेच ओमिक्रॉन बाधित व्यक्तीच्या संपर्कात येऊनच ओमिक्रॉनची लागण होतेय. विशेष म्हणजे भारतात जे 2 ओमिक्रॉनचे रुग्ण सर्वात आधी कर्नाटकात आढळले. त्यात एक जण दक्षिण आफ्रिकेतून आला आहे. तर दुसरा रुग्ण हा डॉक्टर असून, तो डॉक्टर परदेशातून आलेला नव्हता. म्हणजेच ओमिक्रॉन बाधिताच्याच संपर्कात येऊन या डॉक्टरांना ओमिक्रॉनची लागण झाली असावी. ओमिक्रॉन व्हेरियंट घातक नसला तर वेगानं पसरणारा आहे…आता पर्यंत ओमिक्रॉन भारतासह 38 देशांमध्ये पसरला आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI