Special Report | ओमिक्रॉनचा संसर्ग मोठा, पण लसीमुळे धोका कमी?

जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाचा नवा प्रकार असलेल्या ओमिक्रॉनचे रुग्ण भारतात आणि खास करु महाराष्ट्रातही आढळून आले आहेत. मात्र, ओमिक्रॉन व्हेरियंट हा डेल्टा व्हेरियंटपेक्षा कमी घातक असल्याचं एक मत आता समोर येत आहे. त्यामुळे याचा धोका कमी असेल तर मग ओमिक्रॉनची बोंब कुणी ठोकली? हा प्रश्न सध्या जगभरात चर्चिला जातोय. कारण, अमेरिका आता दक्षिण आफ्रिकेवर घातलेली विमानबंदी हटवण्याचा विचार करत आहे.

जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाचा नवा प्रकार असलेल्या ओमिक्रॉनचे रुग्ण भारतात आणि खास करु महाराष्ट्रातही आढळून आले आहेत. मात्र, ओमिक्रॉन व्हेरियंट हा डेल्टा व्हेरियंटपेक्षा कमी घातक असल्याचं एक मत आता समोर येत आहे. त्यामुळे याचा धोका कमी असेल तर मग ओमिक्रॉनची बोंब कुणी ठोकली? हा प्रश्न सध्या जगभरात चर्चिला जातोय. कारण, अमेरिका आता दक्षिण आफ्रिकेवर घातलेली विमानबंदी हटवण्याचा विचार करत आहे. तसंच अनेक देशांमध्ये ख्रिसमसच्या तयारीला वेग आल्याचंही पाहायला मिळत आहे. खुद्द दक्षिण आफ्रिकेतल्या तज्ज्ञांनीही ओमिक्रॉनबाबत ब्रिटन नाहक भीती पसरवत असल्याचा आरोप केला होता.

ओमिक्रॉननंतर दक्षिण आफ्रिकेतही रुग्णवाढ जरुर झाली, मात्र त्यातले 70 टक्के रुग्ण हे मुळात इतर आजारांसाठी दवाखान्यात गेले. नव्या नियमांनुसार साध्या मोतीबिंदूचं जरी ऑपरेशन असलं, तरी आता दवाखान्यांमध्ये ऑपरेशनआधी कोरोना चाचणी करावीच लागते. त्याचप्रमाणे दक्षिण आफ्रिकेत कोरोना चाचण्या झाल्या आणि इतर व्याधींसाठी आलेले 70 टक्के लोक कोरोनाबाधित निघाले. विशेष म्हणजे यातल्या एकाही व्यक्तीला ऑक्सिजनची गरज भासलेली नाही.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI