Special Report | भाजपच्या किरीट सोमय्यांचं टार्गेट अजित पवार ?

अजित पवार यांनी बेनामी मालमत्ता गोळा करण्यासाठी आपल्या बहिणींच्या नावाचा वापर केल्याचंही सोमय्या म्हणाले. सोमय्या यांनी सांगितल्याप्रमाणे आज पुण्यात पत्रकार परिषद घेत अजित पवार यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत.

पुणे : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. जरंडेश्वर साखर कारखान्याचे मूळ मालक हे अजित पवारच असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केलाय. त्यासाठी त्यांनी पत्रकार परिषदेत काही कागदपत्रेही दाखवली आहेत. इतकंच नाही तर अजित पवार यांनी बेनामी मालमत्ता गोळा करण्यासाठी आपल्या बहिणींच्या नावाचा वापर केल्याचंही सोमय्या म्हणाले. सोमय्या यांनी सांगितल्याप्रमाणे आज पुण्यात पत्रकार परिषद घेत अजित पवार यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. मुंबई उच्च न्यायालयानं आपल्या निर्णयात स्पष्ट म्हटलंय की जरंडेश्वर साखर कारखाना खरेदी विक्रीत घोटाळा झालाय. त्याची चौकशी झाली पाहिजे असा आदेश इकॉनॉमिक ऑफेन्स विंग ऑफ महाराष्ट्र पोलीस आणि ईडीला दिले. जरंडेश्वर साखर कारखाना जेव्हा घेतला तेव्हा अजित पवार उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे सर्वेसर्वा होते. यात राज्य सरकारचे पैसे आहेत. अर्थमंत्र्यांनी मंजुरी दिल्यानंतर राज्य सरकारला पैसा जातो. अजित पवारांनी स्वत: त्या कारखान्याची विक्री केली, लिलाव केला आणि स्वत:च स्वत:च्या कंपनीला घेतला. सगळ्या गोष्टींचं उल्लंघन केलं. स्वत: घेतला तोही बेनामी घेतला. त्यांनी सगळ्या बाबींचं उल्लंघन केलं आहे. त्यामुळे त्यांनी पदावर राहता येणार नाही, अशा शब्दात सोमय्यांनी अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची मागणी केलीय.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI