रामदास कदम यांच्यावर शिवसैनिक संतप्त, दसरा मेळाव्यात ‘नो एन्ट्री’

कोरोना प्रादुर्भावामुळे शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावर होणार नाही. मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात 50 टक्के उपस्थितीत हा दसरा मेळावा पार पडणार आहे. मात्र, यावेळी रामदास कदम यांच्यासाठी नो एन्ट्री असेल, असं सांगितलं जात आहे.

रामदास कदम यांच्यावर शिवसैनिक संतप्त, दसरा मेळाव्यात 'नो एन्ट्री'
| Updated on: Oct 15, 2021 | 11:50 AM

मुंबई : कथित ऑडिओ क्लिपमुळे शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांच्या पक्षांतर्गत अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण, शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात रामदास कदमांना एन्ट्री नसेल, अशी माहिती सूत्रांकडून कळतेय. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची घोषणा करण्यात आली आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावर होणार नाही. मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात हा दसरा मेळावा पार पडणार आहे. मात्र, यावेळी रामदास कदम यांच्यासाठी नो एन्ट्री असेल, असं सांगितलं जात आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप केले आहेत. मात्र, त्यासाठी किरीट सोमय्या यांनी शिवसेनेच्याच एका नेत्यानं रसद पुरवल्याचा आरोप करण्यात येत आहे. मनसेचे सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी तसा गंभीर आरोप केलाय. खेडेकर यांनी या प्रकरणात थेट रामदास कदम यांचं नाव घेतलं आहे. इतकंच नाही तर त्याबाबत एक ऑडिओ क्लिपही समोर आली आहे. त्यात किरीट सोमय्या, रामदास कदम आणि माहिती अधिकार कार्यकर्ते प्रसाद कर्वे यांचा संवाद असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, रामदास कदम आणि प्रसाद कर्वे यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.

Follow us
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.