AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Special Report | Raj Thackeray यांच्या सभेमुळे औरंगाबादेत प्रस्थापितांना धक्का? -TV9

Special Report | Raj Thackeray यांच्या सभेमुळे औरंगाबादेत प्रस्थापितांना धक्का? -TV9

| Updated on: Apr 29, 2022 | 9:18 PM
Share

17 एप्रिल रोजी राज ठाकरेंनी औरंगाबादच्या सभेची घोषणा केली आणि तेव्हापासून राज्यभरात औरंगाबादच्या सभेवरुन गदारोळ सुरु झाला. औरंगाबाद हा शिवसेनेचा तसा बालेकिल्ला मात्र 2019 च्या लोकसभा निवडणुकीत MIMने शिवसेनेचा बालेकिल्ला भेदला. शिवसेनेच्या याच जखमेवर आता मनसेच्या बाळा नांदगावकरांनी बोट ठेवलंय.

17 एप्रिल रोजी राज ठाकरेंनी औरंगाबादच्या सभेची घोषणा केली आणि तेव्हापासून राज्यभरात औरंगाबादच्या सभेवरुन गदारोळ सुरु झाला. औरंगाबाद हा शिवसेनेचा तसा बालेकिल्ला मात्र 2019 च्या लोकसभा निवडणुकीत MIMने शिवसेनेचा बालेकिल्ला भेदला. शिवसेनेच्या याच जखमेवर आता मनसेच्या बाळा नांदगावकरांनी बोट ठेवलंय. राज ठाकरेंच्या सभेला लाखो लोकं येवोत मात्र औरंगाबाद हा शिवसेनेचाच गड राहील असं प्रत्युत्तर औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरेंनी दिलंय. गेल्या 30 वर्षांपासून औरंगाबाद पालिकेवर सेना-भाजपची सत्ता होती. मात्र महाविकास आघाडीमुळे भाजप सत्तेतून बाहेर पडली…आता भाजप आणि मनसे युतीच्या चर्चा आहेत. त्यामुळे औरंगाबाद पालिकेची निवडणूक रंजक होईल. औरंगाबाद पालिकेत भाजपने शिवसेनेपासून फारकत घेतली. भाजपने औरंगाबाद पालिकेचं उपमहापौरपदही सोडलं आणि काँग्रेस राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर शिवसेनेचा महापौर निवडून आला.