Special Report | ‘गोपीचंद पडळकर यांना सुबुद्धी मिळावी यासाठी बिरोबांना साकडं’
वैयक्तिक टीका करणे, आत्महत्या झालेल्या महिलांना बदनाम करणे, सरकार वेठीस धरणे या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रात त्ता मिळवण्यासाठी भाजप नेते करत आहेत. त्यातूनच पडळकर यांनी हे विधान केलंय. फडणवीसांसारखे 200 जण शरद पवारांच्या हाताखालून ट्रेनिंग घेऊन गेले असतील. मी पडळकर यांना सुबुद्धी देवो यासाठी बिरोबाकडे साकडं घातलं आहे, अशा शब्दात रुपाली पाटील यांनी पडळकरांना उत्तर दिलं आहे.
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर पुन्हा एकदा जोरदार टीका केलीय. देवेंद्र फडणवीस हे दहा-वीस पवार खिशात घालून फिरतात. शरद पवार हे ज्येष्ठ आहेत, पण श्रेष्ठ नाहीत. त्यांचा विषय असा आहे की, काहीही केले, तर मीच केले. माझ्यापेक्षा कोण पुढे जाता कामा नये, अशी त्यांची वृत्ती आहे. पण, माननीय देवेंद्रजी असे दहा-वीस शरद पवार खिशात घालून फिरतात. त्यांच्यापेक्षा किती तरी प्रगल्भ नेतृत्व देवेंद्रजींचे आहे, अशा शब्दात पडळकर यांनी पवारांवर निशाणा साधला.
पडळकर यांच्या या टीकेला आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून प्रत्युत्तर दिलं जातंय. ‘गोपीचंद पडळकरांसारखे वाचाळवीर भाजपनं तयार केले आहेत. वैयक्तिक टीका करणे, आत्महत्या झालेल्या महिलांना बदनाम करणे, सरकार वेठीस धरणे या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रात त्ता मिळवण्यासाठी भाजप नेते करत आहेत. त्यातूनच पडळकर यांनी हे विधान केलंय. फडणवीसांसारखे 200 जण शरद पवारांच्या हाताखालून ट्रेनिंग घेऊन गेले असतील. मी पडळकर यांना सुबुद्धी देवो यासाठी बिरोबाकडे साकडं घातलं आहे, अशा शब्दात रुपाली पाटील यांनी पडळकरांना उत्तर दिलं आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

