AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Special Report | ST विलीनीकरणासाठी शिवसेना आमदार मैदानात ?

Special Report | ST विलीनीकरणासाठी शिवसेना आमदार मैदानात ?

| Edited By: | Updated on: Jan 09, 2022 | 10:07 PM
Share

या प्रकरणात कळमनुरीचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांच्या लेटरहेडवरील एक पत्र चांगलंच व्हायरल होत आहे. या पत्रात एसटी महामंडळाचं विलीनीकरण करण्यात यावं अशी मागणी करण्यात आली आहे आणि हे पत्र थेट मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आलं आहे. दरम्यान, आमदार संतोष बांगर यांनी मात्र या पत्राबाबत वेगळंच स्पष्टीकरण दिलंय. तर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मात्र हे पत्र जनभावना असल्याचं म्हटलंय.

सरकारमध्ये विलीनीकरणाच्या मागणीसाठी मागील दोन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. राज्य सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी हजारो एसटी कर्मचारी अद्यापही संपावर ठाम आहेत. या संपाला एसटी कर्मचाऱ्यांनी आता दुखवटा असं नाव दिलं आहे. दरम्यान, आता या प्रकरणात कळमनुरीचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांच्या लेटरहेडवरील एक पत्र चांगलंच व्हायरल होत आहे. या पत्रात एसटी महामंडळाचं विलीनीकरण करण्यात यावं अशी मागणी करण्यात आली आहे आणि हे पत्र थेट मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आलं आहे. दरम्यान, आमदार संतोष बांगर यांनी मात्र या पत्राबाबत वेगळंच स्पष्टीकरण दिलंय. तर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मात्र हे पत्र जनभावना असल्याचं म्हटलंय.

संतोष बांगर यांच्या पत्रात नेमकं काय?

एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या रास्त असून एसटी कर्मचारी आणि कामगारांमध्ये प्रचंड आक्रोश आणि संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून एसटी कामगार हे तुटपुंजा वेतनावर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत.

आता वाढत्या महागाई आणि आर्थिक संकटाला कंटाळून एसटी महामंडळाच्या 63 कर्मचाऱ्यांनी आपला जीव गमावला आहे. तरी एसची कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर सहानुभूतीपूर्वक आणि सकारात्मक विचार करुन राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे, अशी मागणी या पत्रातून करण्यात आलीय.