AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Special Report | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या युतीबाबतच्या वक्तव्याचा अर्थ काय?

Special Report | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या युतीबाबतच्या वक्तव्याचा अर्थ काय?

| Edited By: | Updated on: Sep 17, 2021 | 9:35 PM
Share

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या औरंगाबादमधील भाषणाने (Aurangabad) अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कारण मंचावर उपस्थित असलेले केंद्रीय रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांच्याकडे पाहून, मुख्यमंत्र्यांनी त्यांना भावी सहकारी म्हटलं. “मंचावर उपस्थित आज-माजी आणि एकत्रित आले तर भावी सहकारी” असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. त्यांच्या या विधानानंतर शिवसेना-भाजपच्या तुटलेल्या युतीची पुन्हा नव्याने चर्चा सुरु झाली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या औरंगाबादमधील भाषणाने (Aurangabad) अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कारण मंचावर उपस्थित असलेले केंद्रीय रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांच्याकडे पाहून, मुख्यमंत्र्यांनी त्यांना भावी सहकारी म्हटलं. “मंचावर उपस्थित आज-माजी आणि एकत्रित आले तर भावी सहकारी” असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. त्यांच्या या विधानानंतर शिवसेना-भाजपच्या तुटलेल्या युतीची पुन्हा नव्याने चर्चा सुरु झाली आहे. त्यातच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल 16 सप्टेंबरला केलेल्या वक्तव्यामुळे तर त्या चर्चांना आणखी बळ मिळत आहे. चंद्रकांत पाटलांनी पिंपरीतील एका कार्यक्रमात, मला माजी मंत्री म्हणू नका, दोन तीन दिवसात पाहा, असं म्हटलं होतं. आता मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. त्यातील 5 अर्थ आपण पाहूया…