Special Report | केसरकरांमुळं भाजप-शिंदे गटात तणाव

कालच्या पत्रकार परिषदेत केसरकरांनी नारायण राणेंवर आदित्य ठाकरेंची बदनामी केल्याचा आरोपही केला. याआधीही दीपक केसरकरांनी राणेंवर टीका केली होती..त्यावेळी निलेश राणेंनी दीपक केसरकरांवर पलटवार केला होता..पण यावेळी नितेश राणेंनी केसरकरांना उत्तर देणं टाळलंय..

दादासाहेब कारंडे

|

Aug 06, 2022 | 9:30 PM

2021 सालीच उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाचा त्याग करणार होते. 2021 सालीच सेना-भाजपची युती होणार होती आणि 2021 मध्येच महाविकास आघाडीचं सरकार कोसळणार होतं. हा दावा केलाय…शिंदे गटाचे मुख्य प्रवक्ते दीपक केसरकर यांनी. ज्यावेळी शिवसेना-भाजपची बोलणी सुरु होती…त्याच दरम्यान केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. नारायण राणेंना केंद्रात मंत्री करण्यात आलं आणि त्यामुळंच शिवसेना-भाजप युतीची बोलणी थांबली असावी असं केसरकरांचं म्हणणं आहे. सध्या शिंदे गट आणि भाजपची युती आहे. त्यामुळं दोन्ही बाजूचे नेते एकमेकांवर टीकाटिप्पणी करणं टाळतात. अपवाद फक्त केसरकर आणि राणेंचा. कालच्या पत्रकार परिषदेत केसरकरांनी नारायण राणेंवर आदित्य ठाकरेंची बदनामी केल्याचा आरोपही केला. याआधीही दीपक केसरकरांनी राणेंवर टीका केली होती..त्यावेळी निलेश राणेंनी दीपक केसरकरांवर पलटवार केला होता..पण यावेळी नितेश राणेंनी केसरकरांना उत्तर देणं टाळलंय..

 

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें